चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे भूगोल अभ्यास व परीक्षा केंद्र, नवी मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. इयत्ता सहावी ते दहावीतील एकूण १२२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला. त्यामध्ये कुमार श्रीराम अशोक पवार (इ. ६ वी) गोल्ड मेडल, शेंडगे आदिती आप्पासाहेब (इ. ९ वी) सिल्वर मेडल आर्या कपिल मस्के (इ. १० वी) ब्राँझ मेडल अशी पदके पटकावत विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. यासोबतच भूगोल विषयाच्या शिक्षिका अपर्णा डिके यांना त्यांच्या उपक्रमशील कार्याबद्दल “उपक्रमशील भूगोल शिक्षक” हा सन्मान प्राप्त झाला आहे. भूगोल हा विषय विविध स्पर्धा परीक्षांसह दैनंदिन जीवनातही अत्यंत उपयुक्त असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विषयाबद्दलची आवड वाढावी, या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या यशासाठी भूगोल विषय प्रमुख अपर्णा डिके यांच्यासह विषय शिक्षक सिद्धी सावंत, नेहा मेस्त्री, श्रद्धा सावर्डेकर व ज्ञानेश्वर भुवड यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.
*सावर्डे विद्यालयाचे राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत यश*
RELATED ARTICLES



