Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतात प्रथमच नाविकांसाठी आज मार्गदर्शन

भारतात प्रथमच नाविकांसाठी आज मार्गदर्शन

चिपळूण (वार्ताहर) : भारतात प्रथमच आयोजित केल्या जाणाऱ्या मिलाप आयटीएफ सिफेरर्स एक्सपो २०२६ चे प्रदर्शन गुरुवार दि. २९ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत सकाळी १० वाजल्यापासून प्रिन्सेस डॉक मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. जागतिक शिपिंगमध्ये भारतीय खलाशांचे योगदान साजरे करणे हा कार्यक्रम होणार आहे.

मुंबई येथे मिलाप आयटीएफ सिफेरर्स एक्स्पो २०२६ चे उद्घाटन २९ रोजी होणार आहे. एक्सपो इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन आयटीएफद्वारे त्यांच्या भारतीय खलाशी संलग्न संघटनांच्या सहकार्याने आयोजित केले जात आहे. हे खलाशी त्यांचे कुटुंब, आंतरराष्ट्रीय संघटनांचे नेते, उद्योगातील भागधारक आणि सरकारी प्रतिनिधींना एकाच छताखाली एकत्र आणले जाणार आहे. जहाजबांधणी मंत्रालय आणि जहाज बांधणी महासंचालनालय या प्रदर्शनात सक्रियपणे सहभागी होणार असून खलाशाना खलाशांचे हक्क, करिअर विकास, नोकरीची सुरक्षा, आरोग्य कल्याण, आंतरराष्ट्रीय संघटना आणि धोरणकर्त्यांशी संवाद याबद्दल व्यापक माहिती देण्यात येणार आहे.

सागरी समुदायासाठी खास तयार केलेल्या या अनोख्या तीन दिवसांच्या प्रदर्शनात ६००० हून खलाशी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सहभागी होण्याची अपेक्षा आहे. तुमची उपस्थिती खलाशांचा आवाज उंचावण्यास आणि राष्ट्रीय आणि जागतिक सागरी महत्त्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करण्यास मदत करेल. या कार्यक्रमाला सीफरर्स व त्यांच्या कुटुंबीयांनी सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती किंवा समन्वयासाठी सुंदर पिल्ले (७९७७६४४७५६) यांच्याशी संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments