Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*कामथे येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिगाथा प्रदर्शनाचे आयोजन*

*कामथे येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिगाथा प्रदर्शनाचे आयोजन*

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील कामथे येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रांतिकारक गाथा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अशा क्रांतिगाथा प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये, तरुण पिढीमध्ये देशभक्ती निश्चित निर्माण होईल. राष्ट्रप्रेमींचा, प्रदर्शनार्थींचा सामूहिक अभिप्राय विद्यार्थी, युवकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने हिंदू जनजागृती समिती कार्य करत आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे हे क्रांतिकारक प्रदर्शन आहे. अश्या प्रदर्शनातून विद्यार्थी- तरुण पिढीमध्ये देशभक्ती निश्चित निर्माण होईल असा सामूहिक अभिप्राय प्रदर्शन पाहिल्यानंतर जिज्ञासूंनी दिला. तालुक्यातील कामथे येथील बाळासाहेब माटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने क्रांती गाथा प्रदर्शन लावण्यात आले होते. देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे क्रांतिकारकांच्या बलिदानातून- त्यागातून मिळालेले आहे. हा राष्ट्रासाठी केलेला त्याग विद्यार्थ्यांपर्यंत- तरुणांपर्यंत पोहोचावा, त्यांच्यातून देशभक्तीची पिढी तयार व्हावी, या उद्देशाने ‘हिंदू जनजागृती समितीच्या’ वतीने अशा राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती देणारे क्रांतिगाथा प्रदर्शन लावण्यात येते. आजच्या या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांबरोबर संस्थाचालक, शिक्षक -कर्मचारी वृंद, ग्रामस्थ यांचाही चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी संस्थाध्यक्ष डॉ. विजय बाळासाहेब माटे यांनी समिती चांगले कार्य करत आहे. क्रांतिकारक प्रदर्शन खरंच काहीतरी कार्य करण्यास प्रोत्साहन देणारे आहे. शिक्षक प्रदीप ठसाळे, अरुण नटे आणि एस. एस. थोरवडे आदींनी हा स्तुत्य उपक्रम असून या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे अभिप्राय व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments