चिपळूण (प्रतिनिधी) : अनारी येथील वरदानदेवीचा त्रैवार्षिक महोत्सव दि. १ फेब्रुवारी रोजी अनारी येथील श्री क्षेत्र वरदान मंदिर येथे होणार असून या निमित्ताने अनारी गावातील गुरव समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून या देवीची ख्याती असून दर ३ वर्षांनी निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या ठिकाणी हा महोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी देखील हा महोत्सव साजरा केला जाणार असून या निमित्ताने दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी देवीला अभिषेक, सायंकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा, हरिपाठ, रात्री शैलेश महाराज आंब्रे (शेल्डी) यांचे सुश्राव्य किर्तन, महाप्रसाद आणि रात्री ११ नंतर हौशी कलाकार मंडळ, गोळवली (संगमेश्वर)यांच्या नमनाचा कार्यक्रम होणार आहे. दि. ३१ जानेवारी रोजी रात्री पंचक्रोशी स्तरावर नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून अनारी गावातील गुरव समाजाने या महोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. तरी या महोत्सवाला सर्व भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अनारी गावातील गुरव समाज आणि समस्त ग्रामस्थानी केले आहे.
अनारी वरदानदेवीचा १ फेब्रुवारी रोजी त्रैवार्षिक महोत्सव
RELATED ARTICLES



