Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*सात 'मुर्रा' म्हशी, एक जर्सी गायीची विनापरवाना वाहतूक; पोलिसांची कारवाई* *१४ लाख...

*सात ‘मुर्रा’ म्हशी, एक जर्सी गायीची विनापरवाना वाहतूक; पोलिसांची कारवाई* *१४ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त*

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील पोफळी नाका, अलोरे येथे बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक करताना पोलिसांनी कारवाई करून ७ मुर्रा जातीच्या म्हशी व १ जर्सी गाय असे पशुधन तसेच ट्रक असा एकूण १४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २७ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ६.११ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत विशाल वसंत ओसवाल ( ४०, व्यवसाय कापड दुकान, रा. अलोरे मार्केट) यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी इसहाक अब्दल्ला महालुनकर (५७, रा. खेड भोस्ते) व राजेंद्र बाबू तांबे (५०, रा. शिव, खेड) अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपींनी संगनमताने त्यांच्या ताब्यातील ट्रक (MH 04 AP 1658) यामध्ये गुरांची वाहतूक परवाना नसताना केली. जनावरांना पाणी अथवा खाद्य न देता अत्यंत दाटीवाटीने भरून, स्वतंत्र विभाजनाची कोणतीही व्यवस्था न करता आखूड दोरीने बांधून वाहतूक करण्यात येत होती. त्यामुळे जनावरांना वेदना व यातना होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कारवाईत ७ मुर्रा/मुर्रा क्रॉस जातीच्या म्हशी, १ जर्सी जातीची दुभती गाय तसेच ट्रक असा एकूण १४ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपींवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, प्राण्यांचे परिवहन नियम, केंद्रीय मोटार वाहन अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments