Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिरगांवमध्ये उबाठाला जोरदार धक्का कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश*

शिरगांवमध्ये उबाठाला जोरदार धक्का कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश*

चिपळूण (संतोष पिलके) : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिरगांव मधील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सदानंद चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विनोद झगडे, अनंत पवार, वैभव पवार उपस्थित होते.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना सदानंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने चांगलीच मुसंडी मारलेली दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या राजकीय पक्षात असलेल्या शिवसैनिकांना शिवसेनेत परत येण्याचे आवाहन सदानंद चव्हाण यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विरोधी पक्षातून त्यातही उबाठा शिवसेनेला धक्का देण्यात सदानंद चव्हाण यांना अपेक्षित यश मिळत असल्याने त्यांच्या संपर्क कार्यालयात अलीकडे रोज पक्षप्रवेश होऊ लागले आहेत. आज जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य बांधकाम सभापती विनोद झगडे आणि विभागप्रमुख वैभव पवार यांच्या प्रयत्नाने आज मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
या प्रवेश कर्त्यांमध्ये शिरगाव ग्रामपंचायत सदस्य उमेश रामदास चिपळूणकर, सुशांत (आण्णा) बाळ कदम, सागर बाळू मोहिते, धीरज केशव गावनंग, प्रविण दत्ताराम पाचकले, माधव चंद्रकांत मेस्त्री, राजू दत्ताराम कोलगे, सुभाष बागवे, दत्ताराम बागवे, नितीन अनंत चिपळूणकर, समीर महादेव आंबेकर, सतीश सिद्धार्थ मोहिते, समीर सुनील मोहिते, साहिल सुनील मोहिते, यश विनोद जाधव, सागर बबन मोहिते, संदेश संतोष बसवणकर, हरेश नंदकुमार मोहिते, विराज बागवे, संकेत होडे, नीरज बैकर, उमेश बावदाने, सुनील पाचकले, सुरेश पाचकले, विनोद जाधव, सुशील मोहिते, शांताराम कांबळे, बाळू मोहिते, गार्गी उमेश चिपळूणकर, रुक्मिणी मोहिते, प्रतीक साठे, ओंकार शिगवण, नीलिमा मेस्त्री, मनीषा पांचाळ, आरती मेस्त्री(झगडे) या प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता. सदानंद चव्हाण यांनी भगवा झेंडा हातात देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्षात आपला योग्य तो सन्मान राखला जाईल, आपल्याला आज केलेल्या पक्ष प्रवेशाचा कधीही पश्र्चाताप होणार नाही असा विश्वास सदानंद चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिला.
तालुक्यात सदानंद चव्हाण यांच्यासारखे सर्वांना सोबत घेऊन जाणारे आणि कार्यकर्त्यांची कदर करणारे दुसरे नेतृत्व नाही त्यामुळे पूर्ण विचार करून आम्ही चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत प्रवेश केल्याचे या कार्यकर्त्यांनी यावेळी आपली भूमिका मांडताना सांगितले. आजच्या या पक्ष प्रवेशामुळे शिरगांव जिल्हा परिषद गटात शिवसेनेची ताकद वाढली आहे.या पक्ष प्रवेशावेळी गणेश शिंदे, राजाभाऊ ताम्हणकर, इर्शाद मुल्लाजी, अवधूत शिर्के, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.
फोटो फाईल- सीपीएन३१-५
शिरगांवमध्ये उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्याप्रसंगी स्वागत करताना शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विनोद झगडे, अनंत पवार, वैभव पवार आदी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments