Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*खाडीपट्ट्याच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही- रामदास कदम*

*खाडीपट्ट्याच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही- रामदास कदम*

खेड :खेड तालुक्यातील खाडीपट्ट्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कुठेही कमी पडणार नाही, असा ठाम विश्वास शिवसेना नेते व माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी व्यक्त केला. एका दिवसात खाडीपट्ट्यातील आठ गावांमध्ये जाहीर सभा, गाठीभेटी व पक्षप्रवेश कार्यक्रम घेत त्यांनी शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चंद्रकांत उर्फ अण्णा कदम आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार निसार सुर्वे यांना धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन रामदास कदम यांनी मतदारांना केले. यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले की, “खेड मतदारसंघांचे विभाजन होण्याआधी तब्बल वीस वर्षे खाडीपट्टा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. येथील मुस्लिम, कुणबी तसेच सर्व जाती-धर्मातील लोकांनी माझ्यावर अपार प्रेम केले. मात्र त्यानंतर गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदारामुळे खाडीपट्टा विकासापासून वंचित राहिला. आता मात्र चौदा वर्षांचा हा वनवास संपला आहे. अण्णा कदम व निसार सुर्वे यांच्या माध्यमातून खाडीपट्ट्याचा विकासात्मक कायापालट केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी खेड तालुक्यातील सुखदर, शेरवल, संगलट, तळघर, अनासपुरे, होडकाढ, कर्जी, मुंबके, नांदगाव या खाडीपट्ट्यातील गावांमध्ये जाहीर सभा, पक्षप्रवेश व लोकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दौऱ्यात रामदासभाई कदम यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, दयाळ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अण्णा कदम, पंचायत समिती गणाचे उमेदवार निसार सुर्वे व शंकर कांगणे, पंचायत समितीचे माजी सभापती सिकंदर जसनाईक, शांताराम चिंनकटे, दर्शन महाजन, हाशमत परकार यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खाडीपट्ट्यात पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित होणार असल्याचा विश्वास या दौऱ्यातून कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments