Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*युतीचा विजय हाच ध्यास, चिपळूण तालुक्याच्या उज्ज्वल भविष्याची नवी पहाट!- प्रशांत यादव*

*युतीचा विजय हाच ध्यास, चिपळूण तालुक्याच्या उज्ज्वल भविष्याची नवी पहाट!- प्रशांत यादव*

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी ही निवडणूक अत्यंत निर्णायक आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने गाफील न राहता गावोगावी, वाड्यावस्त्यांवर आणि घरोघरी जाऊन युतीचा विचार, जाहीरनामा व विकासाचा संकल्प सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवावा. तसेच चिपळूण तालुका पंचायत समितीवर युतीचा झेंडा फडकावण्यासाठी आपले योगदान द्या, असे आवाहन भाजप नेते प्रशांत यादव यांनी केले. भाजपा-शिवसेना-रिपाइं (आठवले) युतीच्या पेढे जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार दिप्ती दीपक महाडीक आणि दळवटणे पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सायली शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ तिवरे येथे तर अडरे येथे शिरगाव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार दीक्षा कांबळी आणि वेहळे पंचायत समिती गणाचे उमेदवार राम राजेशिर्के युतीच्या पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आ सदानंद चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे, तालुका समन्वयक दिलीप चव्हाण, उपतालुका प्रमुख संजय गणवे, विभाग प्रमुख दीपक वारोसे, अशोक शिंदे, पांडुरंग शिंदे, बावा महाडीक, स्नेहा पालांडे तर अडरे येथील बैठकीला नगरसेवक निहार कोवळे, शिवसेना विभाग प्रमुख वैभव पवार, उपविभागप्रमुख गणेश शिंदे, उपतालुका प्रमुख संजय मोरे, वेहळे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश भोजने, भाजप उपशाखाप्रमुख पंढरीनाथ किलजे, कुणबी समाज अध्यक्ष संजय जाबरे, माजी सरपंच गंगाराम पवार, माजी उपसरपंच सांची पिंपरे, अडरे ग्रामपंचायत सदस्य शंकर कांबळी, ग्रामपंचायत सदस्य रवी कावळकर जीवाजी कांबळी यांच्यासह युतीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments