चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहरातील रॉयल नगर परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोड असून उड्डाणपुलाखाली सुरू असलेल्या खोदकामामुळे विद्यार्थी, नागरिक तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषत दुचाकीस्वारांच्या अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली होती. याची गंभीर दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा कार्यकर्ते साहिल सुरेश पवार यांनी आपल्या रॉयल नगर प्रभागातील सहकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले होते. तात्काळ निवेदानाचे दखल घेत खड्डे बुजवल्याने साहिल पवार यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
साहिल पवार व कार्यकर्त्यांनी चिपळूण शहरात चालू असलेल्या उडडाणपूलाच्या कामादरम्यान नागरीकांना अडचणी येत आहे. त्यामध्ये सध्यस्थितीत सर्व वाहतुक ही सव्हिस रोड वरून जात असल्याने विद्यार्थी तसेच नागरीकांना रोड साईड निचरा वरून पायी चालत जावे लागते. काही ठिकाणी गटाराचे स्लॅब तुटलेले आहेत, काही लोकांनी गटारावर बोर्ड ठेवले आहे तसेच काही ठिकाणी दगड, माती, वाळू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सदर ठिकाणावरून विद्यार्थी तसेच नागरीकांना ये-जा करतांना भितीदायक प्रवास करावाला लागत असल्याने सव्हिस रोडच्या बाजूची गटारे दुरूस्त करावी व गटारावरील अतिक्रमण हटवण्यात यावे. तसेच उडडाणपूलाच्या अप्रोचचे काम करतांना RE पॅनल बसवून झाल्यानंतर जे खोदकाम केलेला भाग आहे तो तात्काळ भरल्या जात नाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने सदर खोदलेला भाग लगेच भरण्यात यावे या करीता साहिल पवार यांनी या कार्यालयास पत्र दिले होते, या पाठपुराव्याची दखल घेत महामार्ग प्रशासनाने तत्काळ हालचाल करत धोकादायक ठिकाणी सुरक्षा सूचना फलक (सावधानता पत्रे) लावले असून उड्डाणपुलाखाली सिमेंटचे पिलर आणि सर्व्हिस रोड दरम्यान केलेल्या खोदकामाचे खड्डे दिरंगाई न करता अवघ्या तीन दिवसांत पूर्णपणे भरून काढण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले असून साहिल पवार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्यक्षम पाठपुराव्यामुळे प्रमुख दोन मागण्या यशस्वीरीत्या मान्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद ठरत असून सामाजिक कार्यकर्ता साहिल पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे
*अखेर सामाजिक कार्यकर्ते साहिल पवार यांच्या प्रयत्नाला यश*
RELATED ARTICLES



