Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*चिपळूण येथे २७ पासून काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर* *स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेसचे...

*चिपळूण येथे २७ पासून काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर* *स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेसचे प्रतिनिधीनी घेणार सहभाग* *काँगेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची लाभणार उपस्थिती*

चिपळूण (वार्ताहर) : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेसचे प्रतिनिधी अधिक सक्षम, संवेदनशील आणि विकासाभिमुख व्हावेत, या उद्देशाने कोंकण विभागातील नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च दरम्यान चिपळूण येथील धवल व्यापारी संकुल मार्ट येथे करण्यात आले आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या कोंकण विभागातील सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असून हे शिबिर त्यांना कामकाज करताना उपयोगी पडणार आहे. हे निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. हे शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी धवल व्यापारी संकुल, चिपळूण येथे सदर शिबिर पार पडणार आहे. या तीन दिवसीय निवासी शिबिरात कोकण विभागातील सर्व उमेदवार सहभागी होणार आहेत. या शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते व संबंधित विषयातील तज्ज्ञ उमेदवार मार्गदर्शन करणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या प्रशिक्षण विभागाचे अध्यक्ष आशुतोष शिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांकडून या शिबिरात सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये लहान शहरे व निमशहरी भागातील नागरी समस्या, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना, विकासकामांची गुणवत्ता, तसेच नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराला काँग्रेस पक्षातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून गेलेल्या प्रतिनिधींनी उपस्थिती रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सोनाललक्ष्मी घाग यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments