चिपळूण (वार्ताहर) : लाईफ केअर हॉस्पिटल व ऑन्को लाईफ केअर सेंटर आणि एसआय ग्रुप इंडिया प्रा. लि., ग्रुप ग्रामपंचायत रसाळ पाली, रोटरी क्लब ऑफ लोटे तथा श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली, सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. १० फेब्रुवारी रोजी रसाळ पाली येथे मोफत आरोग्य शिबिर पार पडले. ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने लाईफ केअर हॉस्पिटल व ऑनको लाईफ केअर सेंटर यांच्यामार्फत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रक्त तपासणी, मोफत औषध वाटप, एस.आर. ऑप्टीशियन वैभव जोशी यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले.तसेच बी.एम.डी मशीनद्वारे हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी. डॉक्टरांचा मोफत सल्ला व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सुविधांचे मार्गदर्शन करून हे शिबिर संपन्न झाले. यावेळी लाईफ केअर हॉस्पिटल व ऑन्को लाईफ केअर सेंटर चिपळूण तज्ञ डॉक्टरवर्ग व त्यांची सर्व टीम उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक नायब तहसीलदार नकुलजी पोलेकर, पाली, सुधागड डॉ. स्वामी योगप्रताप सरस्वती, संस्थापक योगा रिसर्च फाउंडेशन सत्यम सुमिरन, प्रमुख अतिथी अध्यक्ष श्री बल्लाळेश्वर देवस्थान, पाली जितेंद्र गद्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली वैभव आपटे, उपाध्यक्ष सचिन अणेराव, एस, आय.ग्रुप इंडिया प्रा. लिमिटेड सचिव प्रणिता खाडे, व्यवस्थापक उपेंद्र कानडे, रोटरी क्लब ऑफ लोटे अध्यक्ष संदीप सुर्वे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत रसाळ राजेंद्र महाडिक, लाईफ केअर हॉस्पिटल मेडिकल ऑफिसर डॉ.रजनीश रेडीज, जनसंपर्क अधिकारी अभिजीत सुर्वे, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस आय ग्रुप सीनियर मॅनेजर गंगाराम परुळेकर, सचिव सचिन अणेराव यांचे मार्गदर्शन लाभले. नितीन बोथरे, किरण दुर्गे, आर्या खाडे, श्वेता राऊत यांनी सहकार्य केले. या आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिरामध्ये ग्रुप ग्रामपंचायत रासळ गावातील अनेक रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या.
बल्लाळेश्वर देवस्थान रासळ पाली येथे लाईफ केअर हॉस्पिटल व ऑन्को लाईफ केअर हॉस्पिटलचे भव्य मोफत आरोग्य शिबीर उत्साहात
RELATED ARTICLES



