Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेरळ अभ्यास दौऱ्यासाठी दत्तप्रसाद सांगळे याची निवड  गटविकास अधिकारी व नवनिर्वाचित...

केरळ अभ्यास दौऱ्यासाठी दत्तप्रसाद सांगळे याची निवड  गटविकास अधिकारी व नवनिर्वाचित पं. स. सदस्य यांनी दिल्या शुभेच्छा

गुहागर (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने केरळ येथे अभ्यास दौऱ्यासाठी जीवन शिक्षण शाळेचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी दत्तप्रसाद संतोष सांगळे याची निवड झाली आहे. नुकतेच गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, भाजपच्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद रत्नागिरी समग्र शिक्षा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचा राज्याबाहेर अभ्यासदौरा केरळ तिरुअनंतपुरम येथील साराभाई स्पेस सेंटर राजा रविवर्मा आर्ट गॅलरी पद्यानाथ स्वामी मंदिर स्वामी मंदिर त्रिवेंद्रम आणि कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद स्मारक गांधी मंडपम त्रिवेणी संगम येथे भेट देण्याकरिता गुहागर तालुक्यातील 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जीवन शिक्षण शाळेचा विद्यार्थी असलेल्या दत्तप्रसाद सांगळे याला केरळ येथील अभ्यास दौऱ्यासाठी पंचायत समिती गुहागर येथे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, भाजप तालुकाध्यक्ष अभय भाटकर, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य निलेश सुर्वे,मंगेश जोशी, मानसी रांगळे, स्नेहा शिगवण, जिल्हा परिषद सदस्या अपूर्वा बारगोडे, महिला आघाडी अध्यक्षा प्रांजली कचरेकर, वर्गशिक श्री.सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, नगरसेवक उमेश भोसले, युवा जिल्हाध्यक्ष संगम मोरे, कोशाध्यक्ष साईनाथ कळझुणकर तसेच गटशिक्षणाधीकारी श्री. गळवे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments