Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedचिपळूण तालुका क्रीडा अकादमीकडून अजिंक्यताऱ्यावरून शिवज्योत आगमन

चिपळूण तालुका क्रीडा अकादमीकडून अजिंक्यताऱ्यावरून शिवज्योत आगमन

चिपळूण : चिपळूण तालुका क्रीडा अकादमीच्या वतीने गेली २२ वर्षे महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवरून शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणण्याचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. यंदा २२व्या वर्षी सातारा येथील अजिंक्यतारा किल्ला सातारा येथून शिवज्योत चिपळूणमध्ये आणण्यात आली. अकादमीचे प्रमुख मंगेश उर्फ बाबू तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून युवकांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आदर निर्माण करण्याचे कार्य या माध्यमातून केले जात आहे. शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर पवन तलाव परिसरात तिचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली. पुढे चिपळूण नगर परिषद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवज्योतीचे औपचारिक स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शिवज्योत स्वीकारली. बाबू तांबे यांनी शिवज्योत त्यांच्या स्वाधीन केली. या वेळी मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, आरोग्य सभापती शुभम पिसे तसेच नगरसेवक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवज्योतीच्या आगमनामुळे शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले असून युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या वेळी मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, आरोग्य सभापती शुभम पिसे, तसेच नगरसेवक फैसल कासकर, विकी नरळकर, विकी लवेकर, निलम जाधव, उदय जुवळे, वैशाली कदम, राणी महाडिक, प्रमोद बुरटे, हर्षाली पवार, शहनाज वांगडे, कपिल शिर्के, रोहित खाडे, सुयोग चव्हाण यांच्यासह नगर पालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments