Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*संत गाडगेबाबा परिट समाज संस्था जिल्हा रत्नागिरीच्या निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ सपन्न*...

*संत गाडगेबाबा परिट समाज संस्था जिल्हा रत्नागिरीच्या निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ सपन्न* *चिपळूण येथे संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती साजरी*

चिपळूण (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत, वैराग्य मूर्ती गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती निमित्त उपाध्यक्ष वसंत पिंपळकर प्रयोजित संत गाडगेबाबा परिट समाज संस्था रत्नागिरीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा घेतल्या. त्याचा बक्षीस समारंभ संस्थेचे अध्यक्ष पत्रकार सुभाष कदम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी चिपळूण पेठमाप विठ्ठल रुक्मिणी मंदिर सांभागृहात झाला.
निबंध स्पर्धा शालेय गट (८ वी ते १०वी) मध्ये सार्थक वैभव कदम- पेठमाप, चिपळूण- प्रथम, सार्थक प्रकाश महाडिक -भेलसई, ता. खेड- द्वितीय, अंतरा अशोक इंगवले -बुरंबाड ता. संगमेश्वर- तृतीय, पूर्वी विवेक कदम-ओमळी, ता. चिपळूण, नीरजा नितीन कदम- पेठमाप व प्रांजल योगेश चाळके- गोवीळ महाविद्यालयीन गट- श्लोका नवनीत भोसले- खेड- प्रथम, रिया अशोक चाळके- गोविळ, ता. लांजा- द्वितीय, आर्या निलेश चाळके – पाटपन्हाळे, ता. गुहागर- तृतीय, प्रतिक्षा दीपक कदम -पेढाबे, ता. चिपळूण – उत्तेजनार्थ, सई संजय मिरगांवकर – बहादूरशेख, चिपळूण – उत्तेजनार्थ रोख बक्षीसे व सन्मान पत्र देण्यात आले. प्रा. विनायक होमकळस यांनी परीक्षक म्हणून काम पाहिल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला. सर्व यशस्वी विधार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी संत गाडगेबाबा परिट समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाचे सचिव, पुण्याचे प्रा. कचेश्वर राऊत, पूज्य गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस, सल्लागार आबा महाडिक, हसमुखभाई पांगारकर, दीपक म. कदम, संतोष कदम, श्रीकृष्ण शिंदे, सौ. सावित्री होमकळस, कार्याध्यक्ष मनोज शिंदे, उपाध्यक्ष सुयोग घाग, सचिव नवनीत भोसले, खजिनदार राजू भोसले, सहसचिव दिनेश कदम, संघटक दुर्गेश्वर रोकडे, नथुराम जांभुळकर, लॉंड्री अध्यक्ष महेश भोसले, युवक अध्यक्ष नितीन चाळके, महिला कार्याध्यक्ष वैशाली शिंदे, दापोली तालुकाध्यक्ष प्रथमेश दुर्गावळे, खेड तालुकाध्यक्ष मुकेश भोसले, चिपळूण तालुकाध्यक्ष हेमंत कदम, संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र कदम, लांजा – राजापूर अध्यक्ष संदेश चव्हाण सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला जिल्हाध्यक्षा सौ. अंजली पिंपळकर यांनी केले. तर लॉंड्री सचिव रितेश महाडिक यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments