Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*रत्नागिरीत कर्ज वसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्याला मारहाण* *तिघांविरुद्ध अट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा...

*रत्नागिरीत कर्ज वसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्याला मारहाण* *तिघांविरुद्ध अट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल*

रत्नागिरी: शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी परिसरात कर्ज वसुलीच्या कामात अडथळा आणून बँक कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. लक्ष्मण गणु म्हात्रे हे बँक कर्मचारी आपल्या वसुली पथकासह सोमवारी, २४ फेब्रुवारी रोजी मिरजोळे एमआयडीसी येथील हिदायद वस्ता यांच्या घरी गेले होते. वस्ता यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने नियमानुसार त्याची वसुली करण्यासाठी हे पथक दुपारी १२ च्या सुमारास तिथे पोहोचले होते. मात्र, थकीत कर्जाबाबत विचारणा केली असता, हिदायद वस्ता यांनी पथकाशी सहकार्य करण्याऐवजी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद सुरू असतानाच त्या ठिकाणी अल्ताफ संगमेश्वरी आणि हनिफ वस्ता हे दोघे आले. त्यांनी परिस्थिती समजून घेण्याऐवजी लक्ष्मण म्हात्रे यांना उद्देशून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर लवकरच धक्काबुक्कीत झाले आणि संशयितांनी म्हात्रे यांना जीवे मारण्याची धमकी देत शारीरिक इजा केली. सरकारी कामात अडथळा आणून भरदिवसा करण्यात आलेल्या या मारहाणीमुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर लक्ष्मण म्हात्रे यांनी तात्काळ रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्ताफ संगमेश्वरी, हिदायद इस्माईल वस्ता आणि हनिफ हिदायद वस्ता या तिघांवर गुन्हा नोंदवला आहे. पीडित कर्मचारी अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याने, पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलमांसोबतच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अट्रॉसिटी) अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी करणार आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments