Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*डीबीजे महाविद्यालयात ‘इकोज इको’ राज्यस्तरीय स्पर्धा उत्साहात* *अर्थशास्त्र विभागातर्फे प्रश्नमंजुषा व पोस्टर...

*डीबीजे महाविद्यालयात ‘इकोज इको’ राज्यस्तरीय स्पर्धा उत्साहात* *अर्थशास्त्र विभागातर्फे प्रश्नमंजुषा व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन*

चिपळूण (प्रतिनिधी) : नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने “इकोज इको (Eco’s Echo) २०२५-२६” या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा व पोस्टर प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य एम. एस. बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्राचार्य सी. सी. आठवले, रजिस्ट्रार व्ही. आर. जाधव, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस. के. नामदास, डॉ. यू. डी. सूर्यवंशी, प्रा. ए. व्ही. जोशी, सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पोस्टर प्रदर्शनामध्ये आर.बी.आय.चे गव्हर्नर, पंचवार्षिक योजना, वित्त आयोग, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते, भारतीय चलनाची उत्क्रांती व नोटांचा इतिहास, रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांची माहिती तसेच विविध अर्थशास्त्रज्ञांची माहिती अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी माहिती संकलन करून आकर्षक पोस्टर्स सादर केली होती. या प्रदर्शनास नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त व्हाईस चेअरमन डॉ. दीपक विखारे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले. तसेच महाविद्यालयातील विविध शाखांतील विद्यार्थ्यांनीही या प्रदर्शनास भेट दिली. राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत फिरता चषक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम मिळवली. आठल्ये-सप्रे-पित्रे (ASP) महाविद्यालय, देवरुख संघाने द्वितीय, तर डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण संघाने तृतीय क्रमांक मिळवला. सर्व विजेत्या संघांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. यशस्वी स्पर्धक विद्यार्थ्यांचा सत्कार नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य अविनाश जोशी, प्राचार्य एम. एस. बापट व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस. के. नामदास यांच्या हस्ते करण्यात आला. बक्षीस वितरणप्रसंगी अविनाश जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेतील उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. के. आर. चव्हाण, प्रा. डॉ. दिनेश पारखे व प्रा. सौ. प्रिया खवले यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. यू. डी. सूर्यवंशी यांनी केले, सौ. ए. व्ही. जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. एस. के. नामदास यांनी आभार प्रदर्शन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी, सहकारी प्राध्यापक तसेच नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, नियमक समिती सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments