Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*चिपळूण नगरपरिषद मध्ये शिवसेना गटनेतेपदी अंकुश आवले यांची नियुक्ती*

*चिपळूण नगरपरिषद मध्ये शिवसेना गटनेतेपदी अंकुश आवले यांची नियुक्ती*

चिपळूण (राज पिलके) : चिपळूण नगरपरिषदेत शिवसेना गटाची अधिकृत स्थापना करण्यात आली असून, नगरसेवक अंकुश अशोक आवले यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. नगरपरिषदेत पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी आवले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांची या महत्त्वाच्या पदांवर निवड केली.अंकुश अशोक आवले हे नगरपरिषदेत सक्रिय, अभ्यासू आणि जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे म्हणून ओळखले जातात. शहरातील मूलभूत सुविधा, नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, तसेच विकासकामांबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
निवडीनंतर बोलताना आवले यांनी शिवसेना नेतृत्व, सहकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि नगरपरिषदेत शिवसेनेची ठाम व सकारात्मक भूमिका मांडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पारदर्शक कारभार, लोकाभिमुख निर्णय आणि विकासाभिमुख धोरणे राबवण्यासाठी शिवसेना गट एकसंघपणे काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी अंकुश आवले यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण नगरपरिषदेत शिवसेनेचा आवाज अधिक प्रभावीपणे मांडला जाईल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments