Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedसुप्रिया संतोष उतेकर यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती.

सुप्रिया संतोष उतेकर यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती.

चिपळूण (संतोष पिलके ): रत्नागिरी चिपळूण (खेर्डी) येथील सुप्रिया उतेकर यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आज आपली कार्यकारणी जाहीर केली. यामध्ये सुप्रिया उतेकर यांना जिल्हा सरचिटणीस पद देण्यात आले आहे.सुप्रिया उतेकर यांनी याआधी खेर्डी ग्रा.उपसरपंच यांसारख्या पदांवर काम केले आहे. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली असून सुप्रिया उतेकर ह्या नवनियुक्त जिल्हा सरचिटणीस असणार आहेत. शासनाच्या विविध योजना, केंद्र व राज्य शासन यांचे काम लोकांपर्यंत पोहोचवणे, पक्षाकडून येणारे कार्यक्रम राबविणे, पक्ष संघटना मजबूत करणे यासाठी सुप्रिया उतेकर यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. रत्नागिरी दक्षिण जिल्हा पक्षसंघटन अधिक सक्षम प्रभावित करण्यासाठी, पक्षाची ध्येय धोरणे व केंद्रस्तरावरून, प्रदेश कार्यालयाकडून येणाऱ्या जबाबदारी यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आपण सर्वांना एकत्रित करून काम कराल असा विश्वास नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी व्यक्त केला आहे. सुप्रिया उतेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments