चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील मिरजोळी साखरवाडी येथील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मणियार प्लाझा या बिल्डिंगचे ड्रॅनॅजचे पाणी पर्जन्य जलवाहिनीत सोडण्याची उपायोजना न करता ते पाणी थेट रस्त्यावर टाकून रस्ता घाण केल्याची घटना 22 डिसेंबर रोजी घडली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत ग्रामपंचायत मिरजोळी सरपंच प्रचिती भैरवकर यानी बिल्डरच्या विरोधात नोटीस काढली आहे.
या नोटीसात असे नमूद केले आहे की, मौजे मिरजोळी साखरवाडी येथे मणियार प्लाझा बिल्डिंगचे शौचालय व सांडपाणी हे उघड्यावर सोडले असल्यामुळे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपण तात्काळ सदर सांडपाणी शोषखड्ड्याद्वारे किंवा अन्य मार्गाने व्यवस्थापन करावे अन्यथा आपणास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असेही या नोटीसात नमूद केले असताना बिल्डरने या नोटिसीला केराची टोपली दाखवली आहे.15 दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी बिल्डर्सने सांडपाण्याची कोणती उपाय योजना केली नसल्याने ग्रामपंचायत मिरजोळी माजी उपसरपंच व विद्यामान सदस्य विनोद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर सोडल्याने दुर्गंधी पसरत आहे. ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर साचल्याने ये जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या अंगावर ड्रेनेजचे पाणी उडत असून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाची दखल बिल्डरने घेतली नाही तर पुढील आठ दिवसानंतर बिल्डर्स विरोधात पोलीस ठाण्यात व प्रदूषण विभागात तक्रार करण्यात येईल असे ग्रामपंचायत मिरजोळी सदस्य विनोद पवार यांनी सांगितले.
ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर सोडणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल करणार- विनोद पवार
RELATED ARTICLES



