चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगरपरिषदच्या नवनिर्वाचित नगरसेवक गणेश आग्रे यांचा जे.के मैनी चिपळूण कामगार युनियन कडून जाहीर सत्कार करण्यात आला. युनियनच्या वतीने आग्रे यांना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
सत्कार प्रसंगी उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते व नागरिकांनी नवनिर्वाचित नगरसेवक गणेश आग्रे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व नागरिकांच्या प्रश्नासाठी ते सदैव तत्पर राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
जेके मैनी गाणे खडपोली चिपळूण येथे सेवेत असलेले गणेश आग्रे यांना नेहमीच सामाजिक कार्याची आवड असून त्यांचा कामगार,सामाजिक,शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात सक्रिय सहभाग असतो त्यांनी कंपनीतील सेवा बजावत असताना जे.के मैनी कंपनी पतसंस्थेचे सदस्य व सेक्रेटरी पदावर कार्यरत राहून कामगार हिताचे अनेक उपक्रम राबवले
इंटक प्रणित इंजिनिअरींग वर्कर्स असोसिएशन जे.के कंपनी कामगार प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल राहिले
ओझरवाडी स्वयंभु शंकर मंदिरजीर्णोद्धार व उत्सव सक्रिय सहभाग, जय हनुमान मित्र मंडळ, निसर्ग मित्र मंडळ यांच्या विविध उपक्रमात सहभागी असणारे तसेच अडी- अडचणीत असलेल्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या या सेवाभावी स्वभावामुळे चिपळूण नगरपरिषद नगरसेवक म्हणून भरगोस मतांनी निवडून आले असे मत कामगार युनियन पदाधिकारी वसंत चिपळूणकर, अंकुश कदम, शशिकांत शिंदे, राजेश चिंगळे, राजेश शिंदे,संजय सकपाळ,बाबाराम शिंदे व जे.के कामगार पतसंस्था माजी संचालक मंडळ आणि कामगार बंधू यांनी सत्कार करत व्यक्त केले.
या निवडी बाबत कामगारांनी समाधान व्यक्त केले त्यांच्यावर सर्वांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
याप्रसंगी गणेश आग्रे याने नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ” जनतेने दिलेल्या संधीचे सोने करून शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू, ” असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे सत्कार सोहळा विशेष लक्षवेधी ठरला.
नवनिर्वाचित नगरसेवक गणेश सुरेश आग्रे यांचा जे.के कामगार युनियन कडून भव्य सत्कार
RELATED ARTICLES



