Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedडीबीजेत पुष्पगुच्छ प्रशिक्षण संपन्न

डीबीजेत पुष्पगुच्छ प्रशिक्षण संपन्न

चिपळूण (प्रतिनिधी) : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. कनिष्ठ महाविद्यालयातील महिला विकास कक्षातर्फे विद्यार्थीनींना माणदेशी फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पुष्पगुच्छ प्रशिक्षण देण्यात आले. यात हात रुमाला पासून विविध प्रकारची फुले तसेच कागदी फुले कशी बनवावीत याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षक सौ.रेडीज आणि त्याचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बापट उपप्राचार्य सौ़ स्नेहल कुलकर्णी, पर्यवेक्षिका डॉ.खोत, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव, महिला विकास कक्ष प्रमुख सौ.स्वरदा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमाला प्रा. मृण्मयी सोहनी, प्रा.सौ.प्रिया जाधव, श्रीमती प्रा.नम्रता माने,प्रा.सौ.शुभांगी इंगळे, प्रा.सौ.सिध्दी साडविलकर, प्रा. सौ.अंकीता टाकळे आदि उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा.सौ.दिशा दाभोळकर यांनी तर आभार प्रा. तृप्ती यादव यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments