Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*चिपळूण येथे संजीवनी DMLT नर्सिंग कॉलेजमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे उदघाटन*

*चिपळूण येथे संजीवनी DMLT नर्सिंग कॉलेजमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे उदघाटन*

चिपळूण,आज दिनांक 11 मार्च 2026 रोजी
महिलांच्या आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संजीवनी DMLT नर्सिंग कॉलेज, चिपळूण येथे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे उद्घाटन करण्यात आले. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या सामाजिक उपक्रमाला विविध लायन्स क्लब पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून MJF Lion Dr. Shivani Panvalkar (District Chairperson) तसेच Lion Shreya Kelkar (District Chairperson) उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे उदघाटन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
या कार्यक्रमाला लायन्स क्लब चिपळूण, लायन्स क्लब चिपळूण गॅलक्सी, लायन्स क्लब चिपळूण युनिटी, लिओ क्लब चिपळूण युनिटी, लायन्स क्लब सावर्डे आणि लायन्स क्लब सावर्डे आयडीयल या विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या सहकार्यामुळे हा सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन MJF Lion Jagdish Waghulde (Zone Chairman) यांनी केले होते. त्यांनी या उपक्रमामागील उद्दिष्ट सांगताना महिलांच्या आरोग्य, स्वच्छता व सन्मानासाठी अशा सुविधा शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले.
संजिवनी DMLT नर्सिंग कॉलेजमध्ये आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळी स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments