Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*पोलीस कर्मचारीच ठाकरेंच्या उमेदवाराला घेऊन शिंदेंच्या बंगल्यावर* *व्हिडीओ दाखवत अविनाश जाधव...

*पोलीस कर्मचारीच ठाकरेंच्या उमेदवाराला घेऊन शिंदेंच्या बंगल्यावर* *व्हिडीओ दाखवत अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप.*

*ठाणे :* ठाण्यात शिंदे गटाचे काही नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर आता ठाकरे गट आणि मनसेकडून भाजप – शिंदे गटावर गंभीर आरोप केले जात आहे. एक पोलीस कर्मचारी आमच्या उमेदवाराला घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थांनी नेत असल्याचा गंभीर आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला. तसेच त्याचे व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखविले. त्यामुळे ठाण्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काय घडलं? ठाकरे गटाचा उमेदवार आणि पोलीस कर्मचारी; मनसे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यासह गंभीर आरोप केले.
ठाणे महापालिकेत शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि राष्ट्रवादीची (शरद पवार गट) आघाडी आहे. ठाण्यातील शिंदे गटाचे काही उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर रविवारी ठाकरे गटाचे नेते राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि शिंदे गटावर टीका केली.

ठाण्यात नितीन कंपनी परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाबाहेरील एक चित्रीकरण अविनाश जाधव यांनी माध्यमांसमोर सादर केले. यामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार विक्रांत घाग यांना एक पोलीस कर्मचारी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी घेऊन जात असल्याचा दावा अविनाश जाधव यांनी केला. या उमेदवाराला शिवसेनेकडून (ठाकरे गट) उमेदवारी मिळाली होती. असे असतानाही त्यांना एकनाथ शिंदे यांच्या निवावस्थानी का नेले जात होते, याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली. ही निवडणूक पैशांनी आणि पोलीस दबावाखाली घेतली जात आहेत असा आरोपही त्यांनी केला.

*निवडणूक अधिकारी बदलले नाही तर रस्त्यावर*
ठाण्यातील दोन निवडणूक अधिकारी येत्या दोन दिवसांत बदलले नाही. तर आम्ही त्याचा तीव्र विरोध करुन रस्त्यावर उतरू असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. निर्णय मिळत नाही तो पर्यंत आम्ही थांबणार नाही असेही ते म्हणाले.
बिनविरोधसाठी अधिकारी, पैशांचा वापर

आमचे अर्ज बाद करण्याचे अर्धे काम अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी आणि अर्धे काम पैशांनी करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केला. महापालिकेत लुटालूट सुरु आहे. ठाणे शहर वाचवायचे असेल तर जनेतेने विचार करून यांना खाली आणले पाहिजे. जनतेने मतदान करुन या दरोडेखोरांना घरी बसवा असेही विचारे म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments