Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*डीबीजेत आविष्कार भित्तीपत्रकाचे उद्घाटन*

*डीबीजेत आविष्कार भित्तीपत्रकाचे उद्घाटन*

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाङमय मंडळातर्फे इंग्रजी विभागाच्या वतीने ‘आविष्कार’ भित्तीपत्रिक तयार करण्यात आले. सदर भित्तीपत्रकाचे उद्घाटन नुकतेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव बापट यांच्या हस्ते करण्यात आले. भित्तीपत्रक विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्य वाढीस लागावे यासाठी प्रकाशित केले जाते. वर्षभरात प्रत्येक विषयाचे आविष्कार भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात येते. या आविष्कार भित्तीपत्रकात विद्यार्थी आपल्या स्वलिखित कविता, लेख लिहीत असतात. हा अंक इंग्रजी विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे व प्रतिभेचे कौतुक केले. उपप्राचार्य प्रा.सौ.स्नेहल कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रा.डॉ. सुजाता खोत, समन्वयक प्रा.अनंत ढेरे, प्रा. जयंती काटदरे, प्रा.तृप्ती यादव, प्रा. डॉ माधवी जोशी, प्रा. अनिल पुनवतकर, प्रा. स्वरदा कुलकर्णी, प्रा.मदनलाल निपाने, तसेच विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments