चिपळूण / मुंबई (प्रतिनिधी): वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात येणारा भव्य “यशोत्सव २०२६” हा सोहळा येत्या रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघ (R.M.M.S.) हॉल, परळ, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. ट्रस्टच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात वैश्य समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यात येणार असून, गुहागरची कन्या तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष श्री. प्रमोद सिताराम गांधी यांच्या सौभाग्यवती सौ. प्रियांका प्रमोद गांधी यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यशोत्सव २०२६ हा केवळ पुरस्कार वितरण सोहळा नसून नेटवर्किंग, व्यवसायवृद्धी, रेफरल आणि नव्या संधींसाठी एक प्रभावी मंच ठरणार आहे. कार्यक्रमात उद्योजकता, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी या विषयांवर आधारित प्रेरणादायी सत्रांचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी प्रसिद्ध वक्ते प्रदीप लोखंडे, संतोष सकपाळ, दीपक शिंदे व आरती बनसोडे आपले विचार मांडणार आहेत. वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना डॉ. संतोष कामेरकर यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपूर्वी करण्यात आली असून, संस्थेच्या कार्याला दीपक मेजारी, रूपाली तेलवणे, संजय भाट, चंद्रकांत खाडये, विष्णू सातवसे व मनोज आंग्रे या विश्वस्तांचे मार्गदर्शन लाभत आहे. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत सुमारे ७०० वैश्य समाज बांधवांनी नोंदणी केली आहे. याप्रसंगी उद्योगरत्न पुरस्काराने श्री. गिरीश कोळवणकर, सौ. प्रियांका प्रमोद गांधी, सौ. रुषाली सागर मोरये, श्री. राज साडविलकर, श्री. विनय पाताडे व श्री. विनायक धडाम, तर उद्योगश्री पुरस्काराने श्री. दयानंद माणगावकर व श्री. रामकृष्ण कोळवणकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला समाजातील मान्यवर शालीग्राम खातू, संतोष भालेकर, भाई शेटये, तसेच वैश्य समाजातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित राहणार असून, देश-विदेशातील अनेक नामांकित उद्योगपतींचीही उपस्थिती लाभणार आहे. वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट समाजातील एकता, प्रगती आणि सामाजिक उत्तरदायित्व यासाठी सातत्याने कार्यरत असून, या यशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. कार्यक्रमासाठी नोंदणी आवश्यक असून संपर्क अजित लाड – ९८३३०३७३३४ येथे करावा.
*यशोत्सव २०२६ – उद्योजकतेचा, एकतेचा व समानतेचा उत्सव* *गुहागरची कन्या सौ. प्रियांका प्रमोद गांधी यांना उद्योगरत्न पुरस्काराने होणार गौरव*
RELATED ARTICLES



