खेड (प्रतिनिधी) : गुणदे येथील सरस्वती शिक्षण संस्था गुणदेमधील सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालय (माध्यमिक) गुरुकुल विद्यामंदिर (प्राथमिक) व मातोश्री अनुसया माई आंब्रे स्मार्ट स्कूल मधील विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाच्या प्रथम दिनी वनभोजनाचा आनंद घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळ, गाणी, विनोद सादर करत मनसोक्त आनंद घेतला. निसर्गाच्या सान्निध्यात गुणदे गावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ मंदिराच्या परिसरात विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक कर्मचारी यांनी आनंद घेतला. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मिळून भोजन तयार करून त्याचा आस्वाद घेतला. संपूर्ण दिवसभर आनंद ओसंडून वाहत होता. संपूर्ण मंदिर परिसर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने आनंदमय झालेला होता. संपूर्ण वातावरण कसे जल्लोषमय झाले होते. निसर्गातील विविध झाडे-झुडुपे व विविध पक्षांचे आवाज यामध्ये दिवस कधी संपला हे समजलेच नाही. यावेळी सरस्वती शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री. विक्रांत दत्ताजीराव आंब्रे, शाळा समिती अध्यक्ष व संस्था सहसचिव राजेंद्र आंब्रे, सहकारी संचालक संजय आंब्रे यांनी वनभोजन स्थळी सदिच्छा भेट देऊन मुलांचे कौतुक केले. यादिवशी दुग्ध शर्करा योग असा कि, चेअरमन विक्रांत आंब्रे यांचा वाढदिवस असल्याने सर्व विद्यार्थ्यांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी चेअरमन विक्रांत आंब्रे यांनी मुलांशी हितगुज करताना सांगितले कि, निसर्ग आपल्याला बऱ्याचशा गोष्टी देण्याचे अर्थात परोपकाराचे काम करतो. हिच वृत्ती प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जोपासली पाहिजे. यावेळी सहसचिव राजेंद्र आंब्रे यांच्याकडून सर्व मुलांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी गुणदे गावचे प्रथम नागरिक रविंद्र आंब्रे व ग्रामपंचायत मधील कर्मचारी उपस्थित होते. रविंद्र आंब्रे यांनी वनभोजनासाठी सढळ हाताने मदत केली. यावेळी कै. डॉ. स्मृती वाचनालयाच्या संचालिका सौ. नलिनी आंब्रे, सागर आंब्रे, मंथन आंब्रे, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी सुशील जोशी व गुरुकुलच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. अनिता विचारे, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सरस्वती शिक्षण संस्था गुणदेमधील विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात घेतला वनभोजनाचा आनंद
RELATED ARTICLES



