चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील भराडे येथील व्यापारी विलास महादेव चव्हाण (५०) हे २ जानेवारी पासून बेपत्ता होते. या विषयी शिरगांव पोलिसांमार्फत चौकशी सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी ४ वाजता त्यांचा मृतदेह वाशिष्ठी नदीपात्रात आढळून आला. शिरगांव पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विलास चव्हाण हे शुक्रवार २ रोजी दुपारी ३ च्या सुमारास घरात कोणालाही न सांगता निघून गेले होते. त्याबाबत त्यांची पत्नी विनया विलास चव्हाण यांनी अलोरे शिरगाव पोलीस स्थानकात बेपता झाल्याची तक्रार दाखल केली होती. याबाबत शिरगाव पोलिसांकडून चौकशी सुरू असताना त्यांची दुचाकी पिंपळी येथे वाशिष्ठी कॅनॉलच्या पुलाजवळ चावीसह दिसून आली. मात्र त्यांचा कुठेही तपास लागला नाही. त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे त्यांचे लोकेशन दिसून येत नव्हते. अशातच वाशिष्ठी नदीपात्रात गांधारेश्वर दरम्यान सोमवारी सायकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्याप्रमाणे सायंकाळी उशीरा शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई वडील असा परिवार आहे.
*भराडेतील बेपत्ता व्यापाऱ्याचा मतृदेह सापडला*
RELATED ARTICLES



