Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*भात खरेदी केंद्राचा शेतकऱ्याने लाभ घ्यावा- आ. शेखर निकम*

*भात खरेदी केंद्राचा शेतकऱ्याने लाभ घ्यावा- आ. शेखर निकम*

चिपळूण (प्रतिनिधी) : भात खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांनी लाभघ्यावा, असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या खरीप हंगाम २०२५-२०२६ च्या शासकीय आधारभूत दर धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी केले.

ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकवलेले अधिकचे भात वाया जाऊ नये म्हणून शासन दरवर्षी भात खरेदी करते. यावर्षी भाताला प्रति क्विंटल २३६९ रुपये दर शासनाने घोषित केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पेऱ्याची नोंद केली आहे, त्यांनी संघाच्या कार्यालयात येऊन भात विक्रीसाठीची नोंदणी ३१ जानेवारीपर्यंत करावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतीकडे वळावे यासाठी संघ कसोशीने प्रयत्न करीत आहे. गतवर्षी संघाने २३,१०७ क्विंटल भात खरेदी केले होते. यावर्षी त्यापेक्षा जास्त खरेदी करण्याचे प्रयत्न संघ करीत आहे. त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद द्यावा, यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी सहकार्य करीन, असे आश्वासन निकम यांनी दिले.

यावेळी संघाचे चेअरमन दिलीप माटे, व्हाईस चेअरमन अजित कोकाटे, जेष्ठ संचालक, माजी चेअरमन अशोक कदम, पांडुरंग माळी, कृष्णा खांबे, विजय शिर्के, नंदकिशोर शिर्के, कृष्णा काळबे, दिनेश माटे, रघुनाथ सावंत, अनिल चिले, रमेश राणे, विलास चिपळूणकर, विकास घाग, कमलेश साळवी, स्मिता चव्हाण, माधुरी गोखले, प्रिया विचारे, उपविभागीय कृषी अधिकारी शिंदे, तालुका कृषी अधिकारी म्हेत्रे, संघाचे व्यवस्थापक पांडुरंग कामळे, शेतकरी संजय मोरे, सुलभा मोरे, महादेव धाडवे, दत्ताराम शिंदे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments