Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुलांना जगाशी संवाद साधायला शिकवा: खा. नारायण राणे परशुराम शिक्षण संस्थेच्या पी....

मुलांना जगाशी संवाद साधायला शिकवा: खा. नारायण राणे परशुराम शिक्षण संस्थेच्या पी. के. सावंत माध्यमिक विद्यालय, अडरेला दिली भेट

चिपळूण : आजचा विद्यार्थी उद्याचे भवितव्य आहे. त्यामुळे त्यांना जगाशी संवाद साधण्याचे धडे द्या असे मार्गदर्शन माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी केले. चिपळूण तालुक्यातील अडरे येथील परशुराम शिक्षण संस्थेच्या पी. के. सावंत माध्यमिक विद्यालयला आज खा. राणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत सौ. निलमताई राणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते. तर व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप कदम, डॉ. विनिता कदम सौ. चित्राताई वाघ, मुख्याध्यापक डी. व्ही. शिंदे उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने खा. राणे आणि सौ. राणे यांचा सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करताना खा. राणे म्हणाले, आजचे विद्यार्थी उद्याचा भवितव्य आहे , त्यांना शिक्षणाबरोबर संस्कार देऊन घडवणे आवश्यक आहे शिक्षणाने जीवनात किती प्रगती होते हे शिक्षकांनी त्यांना सांगणे आवश्यक आहे. यातील मुले उद्या मोठी झाली तर संस्था अध्यक्ष, शिक्षकांचेच नाव घेणार आहे हे सांगताना ग्रामीण भागातील शिक्षकांवर मुले घडवण्याचा मोठी जबाबदारी आहे, त्याला शहरी स्पर्धेसाठी तयार करावे लागणार आहे म्हणूनच शिक्षकांनी अधिक लक्ष देऊन शिक्षण दिले पाहिजे. जगाशी संवाद कसा साधावा याचे ज्ञान त्यांना द्या, मी कोणीतरी बनेन असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करा असे खा. राणे म्हणाले तर फार मोठे व्हा, शाळेचे नाव मोठे करा असेही ते म्हणाले. खा. राणे यांचे मुलांनी पुष्पवृष्टी करून आगळे स्वागत केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments