गुहागर : गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे वितरित करण्यात येणारा कै. सुभाष शांताराम गोयथळे स्मृती गौरव पुरस्कार अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांना प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम गुहागर शहरातील मँगो व्हिलेज येथील बँक्वेट हॉलमध्ये झाला. गुहागर तालुका पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी तालुक्यात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्तींना कै. सुभाष शांताराम गोयथळे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते. हा सन्मान अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर गुहागर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील दोघांचे प्राण वाचवणाऱ्या गुहागर नगरपंचायतीचे जीवरक्षक, समर्थ स्पोर्ट क्लबचे कर्मचारी यांचा विशेष सत्कार केला. गटविकास अधिकारी शेखर भिलारे, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, नवनिर्वाचित नगराध्यक्षा नीता मालप, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांचाही सत्कार केला.
‘सुभाष गोयथळे’ पुरस्कार उदय रावणंग यांना प्रदान
RELATED ARTICLES



