Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedपत्रकार दिनी खेडमध्ये समाजसेवेचा आदर्श — पत्रकार संघटनेचे रक्तदान शिबीर यशस्वी

पत्रकार दिनी खेडमध्ये समाजसेवेचा आदर्श — पत्रकार संघटनेचे रक्तदान शिबीर यशस्वी

खेड (प्रतिनिधी) : मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत खेडमध्ये समाजसेवेचा सुंदर संदेश देणारे रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. मंगळवार, दिनांक ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने भरणे येथील जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित या शिबिराला तालुक्यातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोल्हापूर येथील बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल अंतर्गत कार्यरत वैभवलक्ष्मी ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. घरडा हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने रक्तदात्यांची व्यवस्थित प्राथमिक तपासणी करत सुरक्षित रक्तसंकलन प्रक्रिया पार पाडली. या शिबिरात एकूण ३५ युनिट रक्त संकलित झाले असून भविष्यातील आपत्कालीन सेवांसाठी हे रक्त उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमाला नगराध्यक्ष माधवी बुटाला, माजी नगराध्यक्ष गौरी पुळेकर, माजी नगराध्यक्ष व भाजप नेते वैभव खेडेकर, तहसीलदार सुधीर सोनवणे तसेच माजी खासदार हुसेन दलवाई यांनी भेट देऊन पाहणी केली. उपस्थित मान्यवरांनी पत्रकार संघटनेच्या पुढाकाराचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे नमूद केले. शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गोविंद राठोड यांच्यासह उपाध्यक्ष राकेश कोळी, ज्ञानेश्वर रोकडे, उमेश खेडेकर, शुभम केसकर, सिद्धेश परशेट्ये, दिलीप देवळेकर, नंदेश खेडेकर, सागर कदम, सचिन खेडेकर, रुपेश चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर प्रभू, हर्षल शिरोडकर, चंद्रकांत बनकर, देवेंद्र जाधव, संतोष आंब्रे, मनोहर गद्रे आदी पदाधिकारी व पत्रकार बांधवांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन प्रणाली भोसले यांनी केले. शेवटी उमेश खेडेकर यांनी सर्व मान्यवर, रक्तदाते आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. मराठी पत्रकार दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामुळे पत्रकार दिनाला सेवाभावी उपक्रमाची अर्थपूर्ण जोड लाभली असून खेड तालुक्यात पत्रकार संघटनेने उभा केलेला हा समाजसेवेचा आदर्श विशेष दखलपात्र ठरला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments