चिपळूण : आज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना यानिमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले. पत्रकार दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील घडामोडी, प्रश्न आणि वास्तव निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात नंदकुमार चिटणीस, पत्रकार सुभाष कदम, महेंद्र सुर्वे, योगेश बांडागळे, ललेश कदम, संतोष पिलके, संतोष कुळे तसेच संपादक सतीश कदम यांचा जिजाऊ ब्रिगेडतर्फे सदाफुलीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. पत्रकारांच्या माध्यमातून समाजातील बातम्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात. त्यांच्या या मोलाच्या योगदानाबद्दल जिजाऊ ब्रिगेडने आभार व्यक्त करत भविष्यातही असेच सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या सन्मान सोहळ्यावेळी जिजाऊ ब्रिगेड रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष स्नेहलताई चव्हाण, जिल्हा सचिव पूर्वा तांदळे, जिल्हा कायदे सल्लागार ॲड. वृषाली सावंत, तालुका संघटक सुकन्याताई चव्हाण, खेड तालुका अध्यक्ष रोहिणी मोरे तसेच सदस्या जया मोरे या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
पत्रकार दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेडतर्फे पत्रकारांचा सन्मान
RELATED ARTICLES



