Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*चिपळूण नगर परिषदेत राष्ट्रवादी गटनेतेपदी योगेश पवार*

*चिपळूण नगर परिषदेत राष्ट्रवादी गटनेतेपदी योगेश पवार*

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगर परिषदेतील अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी योगेश जगन्नाथ पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल आमदार शेखर निकम यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
योगेश पवार हे यशस्वी व्यावसायिक असून सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. चिपळूण नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ८ मधून मातब्बर उमेदवाराचा पराभव करत मोठ्या मतांनी विजय मिळवला होता. त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत पक्षाने त्यांच्यावर गटनेतेपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल आ. शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, मनोज जाधव तसेच नगरसेविका शैनाज वांगडे यांनी योगेश पवार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments