Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*मराठी मुक्त पत्रकार संघातर्फे लेखक, कवी मिलिंद कदम यांचा सन्मान*

*मराठी मुक्त पत्रकार संघातर्फे लेखक, कवी मिलिंद कदम यांचा सन्मान*

चिपळूण (वार्ताहर) : खेरशेत गावचे सुपुत्र, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी मिलिंद कदम यांचा सामाजिक क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाच्यावतीने सन्मान करण्यात आला. पत्रकार दिनी दि. ६ जानेवारी रोजी मुंबई येथे हा सन्मान सोहोळा उत्साहात पार पडला. या विशेष सन्मानाबद्दल मिलिंद कदम यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दि. १ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाला २५ वर्षे पूर्ण झाली. संस्था रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असून यानिमित्ताने मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन व पत्रकार दिनाचे औचित्य साधून संस्थेत भरीव योगदान देण्याबरोबरच विविध क्षेत्रांत उल्लेखनिय कामगिरीने आपला ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. मिलिंद कदम गुहागर पंचायत समितीत कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून सेवा बजावित असतानाच सामाजिक क्षेत्रात झोकून काम करीत आहेत. विविध वृत्तपत्रांतून परखड लिखाण करीत समाजातील ज्वलंत प्रश्नांवर लक्ष वेधत समाजजागृती करीत आहेत. याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक उपक्रमांना मदतीचा हात देखिल ते देत आहेत.
या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या लोकाभिमुख कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनी सन्मानचिन्ह, शाल, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार, डॉ. सुकृत खांडेकर यांच्याहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नगरपाल महाराष्ट्र शासन डॉ. जगन्नाथ हेगडे, समाजसेविका जयश्री संगीत राव, संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर, सचिव अशोक भोसले, शशिकांत सावंत, मिलिंद कदम यांचे बंधू राजेंद्र कदम व चिरंजिव मिहिर कदम, संतोष पवार, अजित हळदे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments