Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedचारगांव प्रिमियर लीग स्पर्धेत जेतेपद छत्रपती वॉरिअर्स संघाला श्री रामवरदायनी क्रिकेट क्लब...

चारगांव प्रिमियर लीग स्पर्धेत जेतेपद छत्रपती वॉरिअर्स संघाला श्री रामवरदायनी क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धा संपन्न

चिपळूण (प्रतिनिधी) : श्री रामवरदायनी क्रिकेट क्लब आयोजित पार पडलेल्या चारगांव प्रिमियर लीग स्पर्धेत जेतेपद संतोष हुमणे याचा छत्रपती वॉरिअर्स संघाला तर उपविजेता ठरला निशांत मोहीते याचा विहाना इलेव्हन संघ. पाली भुवडवाडी येथील मैदानावर खेळविण्यात आलेल्या चारगांव प्रिमियर लीग स्पर्धेत सहा संघमालक सहभागी होते. सदर स्पर्धेला उद्घाटन व बक्षीस वितरणाला जि. प. सदस्या सौ. दिप्ती महाडिक चारगांव कुणबी समाज संघटना अध्यक्ष व मा. शिक्षण विस्तार अधिकारी विजय थोरे, निरबाडे ग्रामपंचायत सरपंच रोहन महाडिक, प्रशांत महाडिक, दिपक महाडिक, अशोक साळवी, महेंद्र थोरे, उदय मोहीते, सुरेश भुवड, शंकर तांबीटकर अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रथमच चारगांव मर्यादित घेण्यात आलेल्या लिलावात सहा संघमालक व ७२ खेळाडू यांच्या सहकार्याने श्री रामवरदायनी क्रिकेट क्लब, पुणे आयोजित चारगांव प्रिमियर लीग नावाने अत्यंत उत्साहाने व खिलाडूपणे प्रत्येक क्रिकेटपटूंनी आपला कौशल्यपुर्ण खेळ दाखवून चारगांवामध्ये कौतुकास पात्र ठरले आहे. सदर स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी विनोदकुमार शिंदे सहाय्यक गटविकास व प्रकल्प अधिकारी देवरूख, जगदिश लांबे क्राईम रीपोर्टर महाराष्ट्र राज्य, रमेश मांजरेकर काडवली माजी सरपंच, रामवरदायनी शिक्षण संस्थेचे सल्लागार विलास महाडिक, चित्तरंजन लांबे, ह.भ.प. शैलेश सुतार, सदानंद गोरखे आदी उपस्थित होते. स्पर्धेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक १५ हजार रूपये व चषक श्री समर्थ रामदास स्वामी मंडळ निरबाडे निर्मळवाडी व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १० हजार रूपये व चषक श्री विठ्ठल रखुमाई ग्रामस्थ मंडळ पाली भुवडवाडी यांच्या वतीने तर अनेकांनी वस्तू व देणगीदार यांचे क्लबच्या वतीने आभार मानन्यात आले. एक महिन्यापुर्वी निरबाडे येथे सदर क्रिकेट क्लबच्या वतीने संघमालक यांच्या समक्ष लिलाव पद्धतीने संघाची निवड प्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये छत्रपती वॉरिअर्स संघमालक – संतोष हुमणे, समर्था इलेव्हन – नितीन महाडिक, इगल फायटर- दिपक नाकते, रूद्र वॉरिअर्स- रोहन महाडिक, अवनिश सुपर कींग- कुणाल खापरे आणि विहाना इलेव्हन- निशांत मोहीते या सहा संघमालकानी ७२ क्रिकेट खेळाडू यांच्यातुन ऑक्शनने आपल्या पसंतीचे खेळाडू घेतले आणि आपला संघ तयार केला आहे. चारगांवमध्ये प्रथमच मोठय़ा उत्साहाने व उत्तम प्रकारे क्रिकेट खेळाडूंची निवड प्रक्रिया करण्यात आली. त्याचे कौतुक अनेकांनी केले आहे चारगांवातील खेळाडूंना घेऊन ही स्पर्धा चारगांव मर्यादित एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा -चार प्रिमियर लीग अशी पहिल्यांदाच स्पर्धा संपन्न झाली . सदर स्पर्धेसाठी निरबाडे, पाली, खांदाट ता चिपळूण व काडवली ता. खेड या गावातील बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी श्री रामवरदायनी क्रिकेट क्लब, पुणे यांबरोबर मुंबई, पुणे व चारगांवातील क्रिकेट प्रेमी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. चारगाव प्रिमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण ‘कोकणी मज्जा’ या युट्यूब चॅनेलवर अनेकांनी सदर स्पर्धेचा आनंद घेतला. चारगाव प्रिमियर लीग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री रामवरदायनी क्रिकेट क्लब, पुणे च्या सर्व सदस्य, चारगांवातील क्रिकेट प्रेमी आणि पाली भुवडवाडी ग्रामस्थ यांनी खुप मेहनत घेतली. स्पर्धेचे समालोचन अमेय सुर्वे, सुनिल लांबे, आर्यन मोहीते यांनी तर सुत्रसंचलन मनोज काजवे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments