चिपळूण (प्रतिनिधी) : पहिल्या जिल्हास्तरीय रोबोकॉन स्पर्धेच्या यशानंतर स्काय रोबोटिक्स पुणेच्यावतीने रोबोकॉन २ या कोकण विभागीय आंतर शालेय रोबोटिक़ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ही स्पर्धा सर्वंकष विद्यामंदिर, रत्नागिरी यांच्या सहकार्याने दि. १७ जानेवारी रोजी विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.
रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी ही स्पर्धा खुली करण्यात आली आहे. गतवर्षी १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या रोबोकॉन स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजेही स्पर्धा ‘लाईव्ह बिल्ड अॅण्ड एक्झिबिट’ या स्वरूपात असणार आहे. सहभागी विद्यार्थी स्पर्धेच्या ठिकाणी रोबोट, मॉडेल्स तयार करणार असून त्यानंतर त्याचे सादरीकरण व प्रदर्शन केले जाणार आहे. तसेच या ठिकाणी रोबोट गॅलरी आणि विविध आव्हानात्मक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या कल्पकता, तांत्रिक समस्या निवारण क्षमतेची चाचणी घेणे हा या स्पर्धेचा मुख्य भाग असल्याचे आयोजक अभिजीत सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. या स्पर्धेत सहभागी होणार्या विद्यार्थ्यांना रोबोकॉन-२ चे पदक, सहभाग प्रमाणपत्र तर शाळेला सहभाग चषक देण्यात येईल. सर्वोत्तम कामगिरी करणार्या विद्यार्थी व शाळांना विजेता व उपविजेता चषक देऊन गौरव होईल. प्रत्येक शाळेने जास्तीत जास्त दोन प्रवेशिका पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी अभिजीत सहस्त्रबुद्धे, कृष्णमूर्ती बुक्का यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*रत्नागिरीत १७ रोजी होणार कोकण विभागीय रोबोकॉन-२ स्पर्धा* *रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांचा सहभाग*
RELATED ARTICLES



