Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिस्तबद्ध विकास आणि सुस्वभावावर विश्वास ठेवत डॉ. अब्बास व डॉ. रहमत जबले...

शिस्तबद्ध विकास आणि सुस्वभावावर विश्वास ठेवत डॉ. अब्बास व डॉ. रहमत जबले यांचे राष्ट्रवादीत सन्मानपूर्वक स्वगृही आगमन

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले कालुस्तेचे माजी सरपंच डॉ. अब्बास जबले व डॉ. रहमत जबले यांनी आमदार शेखर निकम यांनी आजवर केलेल्या शिस्तबद्ध, नियोजनबद्ध विकासकामांवर तसेच कोणालाही न दुखावणाऱ्या त्यांच्या सुस्वभावावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजेच त्यांचे सन्मानाने आणि विश्वासाने स्वगृही परतणे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी आमदार शेखर निकम यांनी डॉ. जबले बंधूंशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या सामाजिक व स्थानिक अडचणी जाणून घेतल्या. त्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करत संबंधित बाबी सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. समाजासाठी सेवाभाव जपणाऱ्या व्यक्तींचे पक्षात स्वागत करताना आमदार निकम यांनी “सेवा, विकास आणि विश्वास” या मूल्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठामपणे उभी आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, समीर काझी, इम्रान कोंडकरी, पांडू शेठ माळी, खालीद दाभोळकर, लतीफ बाई परकार, इमरान खतीब, सचिन पाटेकर, इमाम शहा, नूरबाई बिजले, मनोज जाधव, जमीर काझी, प्रभाकर सेतवडेकर, सुदेश पवार, राजेंद्र काणेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. डॉक्टर अब्बास व डॉक्टर रहमत जबले यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक बांधिलकीला नवी ऊर्जा मिळाली असून, कालूस्ते व चिपळूण परिसरातील विकासाला आणखी बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments