Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*शिवाई चालकांचा संप किशोर देसाईंच्या मध्यस्थीमुळे टळला* *नाम.योगेश कदमांचे निर्देश*

*शिवाई चालकांचा संप किशोर देसाईंच्या मध्यस्थीमुळे टळला* *नाम.योगेश कदमांचे निर्देश*

दापोली(प्रतिनिधी) : शिवाई ई बस चालवणाऱ्या दोन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये दापोलीत वाद निर्माण झाल्याने या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रवाशांचे हित लक्षात घेऊन दापोलीचे आमदार व राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या निर्देशानुसार जिल्हापरिषद सदस्य किशोर देसाई यांनी कर्मचाऱ्यांसमवेत बैठक घेऊन सामंजस्याने तोडगा काढल्याने दि. २३ एप्रिल पासून होणारे कर्मचाऱ्याचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
दापोली आगारामध्ये ओलेक्ट्रा कंपनीच्या अंतर्गत ई बस सेवा सुरू असून ९ मीटर लांबीच्या ११ बसेस या खेड व चिपळूण या मार्गावर तर १२ मीटर लांबीच्या १० बसेस या बोरीवली, ठाणे, पुणे या मार्गावर सेवा देत आहेत. या बसेसचे नियमन ईव्ही ट्रान्स कंपनी करत असून या बसेससाठी चालक पुरवणे तसेच साफसफाई व अन्य बाबी या स्टार क्रीस्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पाहत आहे. काही दिवसापूर्वा या दोन्ही कंपन्यांचे डेपो मॅनेजर हे केबिनमध्ये चर्चा करत असताना एका कामगाराला या चर्चा आपल्यासंदर्भात सुरू असल्याचे समजले व त्यावरून त्यांनी वाद निर्माण केला. त्यामुळे कंपनीने त्याला कामावरून कमी केले. त्यावेळी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यावेळी यश आले नाही. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपण काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. ही बाब राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्यापर्यंत पोहचताच त्यांनी याबाबत जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. किशोर देसाई यांना या प्रश्नाबाबत लक्ष देण्यास सांगितले. त्यानुसार श्री. देसाई यांनी दोन्ही बाजू समजावून घेतल्या व आपल्या देशाच्या कायद्यानुसार एखाद्याला थेट शिक्षा देणे चुकीचे असून दोन्ही बाजूंनी संयम पाळणे गरजेचे असल्याचे सांगत आपण दापोली आगारामध्ये एक कुटुंब म्हणून कार्यरत आहोत. याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. सदर कर्मचाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली असल्याने हा प्रश्न संपवावा व यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनीच काळजी घ्यावी. असे सांगितले. ज्या ज्यावेळी कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल त्यावेळी आम्ही सर्व पदाधिकारी ठामपणे या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू मात्र याचा गैरफायदा कर्मचाऱ्यांनी घेता कामा नये, असेही सांगितले. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींजवळ चर्चा होऊन सदर प्रश्न निकाली काढून आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी ईव्ही ट्रान्सचे श्री. जाधव, डेपो मॅनेजर मोरे, स्टार क्रीस्ट कंपनीचे डेपो मॅनेजर साजन जाधव, दापोली मंडणगड एसटी प्रवासी मित्र संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर, खजिनदार आसिफ खलपे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments