Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*स्व. हमीद दलवाई यांचे विचार हेच गावचे वैभव- आ शेखर निकम* *ग्रामपंचायत...

*स्व. हमीद दलवाई यांचे विचार हेच गावचे वैभव- आ शेखर निकम* *ग्रामपंचायत मिरजोळीच्या नूतन इमारतीला निधी कमी पडणार नाही- सरपंच विनोद पवार* *कासम दलवाई यांचे स्वप्न पूर्ण करणार*

चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील मिरजोळी गाव म्हणजे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असणारे गाव आहे. लेखक हमीद दलवाई यांची शिकवण आणि त्यांचे विचार हेच या गावाचे नैतिक वैभव आहे. राजकारणाच्या पटलावर हुसेन दलवाई यांच्या सारखे समाजवादी विचार जपणारे नेतृत्व आहे. त्यामुळे एक आदर्श गाव आणि समतेच्या वाटेवरून बंधुत्वाची भावना जपणारे मिरजोळी गाव असल्याचे गौरवोद‌्गार मिरजोळी येथे विकास कामाचे भूमिपूजन करताना चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले. मिरजोळी येथे ग्रामपंचायत नवीन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ शेखर निकम बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले, चिपळूण नगरपालिका नगराध्यक्ष उमेश सकपाळ, जिल्हा परिषद सदस्या सौ रावी मोरे, संजय कदम, महालक्ष्मी साळुबाई ट्रस्ट अध्यक्ष कमलाकर आंब्रे, पोलीस पाटील नंदिनी पवार, मिरजोळी ग्रामपंचायत प्रभारी सरपंच विनोद पवार, सदस्य संदीप जाधव, गणेश निवाते, माधुरी सकपाळ, वृषाली कदम, मुमताज दलवाई, ग्रामविकास अधिकारी रोहिदास हंगे तंटामुक्ती अध्यक्ष जबिन दलवाई, ग्रामस्थ खालीद दलवाई, खलील दलवाई, इनायात दलवाई,आदिब दलवाई,डॉ. राजन साखरपेकर, मिरजोळी ग्रामपंचायत कर्मचारी जितेंद्र पवार, निरज मोहिते, पत्रकार राजेश जाधव, मिलिंद सकपाळ, करिष्मा पवार, उज्वला जाधव आदी उपस्थित होते.
आ. निकम पुढे म्हणाले की, स्व. कासम दलवाई विकास कामासाठी कायम अग्रेसर असायचे. कामाचा पाठपुरावा करण्याची पद्धत निश्चितच वेगळी होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्व कामे अधुरी आहेत. त्यानंतर सरपंच विनोद पवार यांच्यावर जबाबदारी आली. त्यांनी सततच्या पाठपुराव्याने जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडं कामांचा पाठपुरावा केला. मिरजोळी ग्रामपंचायतीला जनसुविधा योजनेतून २० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, मिरजोळी ग्रामपंचायत इमारत आराखडा दोन मजली असल्याने हा निधी कमी पडणार आहे. त्यामुळे इतर योजनेतून पालकमंत्री उदय सामंत यांच्या मदतीने निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आ निकम यांनी दिले. शैक्षणिक क्षेत्रात ही मिरजोळी गाव अग्रेसर आहे. त्यामुळे गुणवत्ता आणि परिश्रम घेण्याची क्षमता येथील ग्रामस्थांमध्ये आहे असे त्यांनी सांगितले.
मिरजोळी गाव हे शहरालगत असून कचरा प्रकल्प सुद्धा सुरू आहे. मात्र कचरा प्रकल्पाला समस्या उद्भवत असल्याने नगरपालिकेने सहकार्य करावे असेही आ.निकम यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना निदर्शनास आणून दिले. यानंतर गुहागर मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा देताना ते म्हणाले की, मिरजोळी ग्रामपंचायत इमारतीला ६८ वर्ष पूर्ण झाली आहे. या इमारतीने अनेक नेतृत्व घडवले असून अनेक सामाजिक कार्यकर्ते घडवले असल्याचे त्यांनी नमूद केले. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यानी स्व. कासम दलवाई आजारी असताना हॉस्पिटलमध्ये भेट घेतली असता त्यांनी मला सांगितले की, काहीही करा पण माझ्या मिरजोळी गावासाठी कचरा प्रकल्प, पाण्यासाठी व ग्रामपंचायत इमारतीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून निधी उपलब्ध करून द्या. तुमच्यातील गावाच्या विकासासाठी असणारी ओढ दिसून आली. स्व.कासम दलवाई यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरपंच विनोद पवार यांनी उत्तम प्रयत्न केले आहेत . नवीन इमारतीसाठी लागणारी मदत नगरपालिका व पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पवार यांनी केले तर आभार दलवाई हायस्कूल मुख्याध्यापक रोहित जाधव यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments