चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत सावर्डे येथील विद्यालयाच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दि. २९ मार्च रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांना मराठी विश्वकोशाचे सखोल ज्ञान प्राप्त व्हावे हा होता. १०० गुणांच्या या परीक्षेत विद्यालयातील सुमारे २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत विद्यालयाचा गौरव वाढवला. तालुकास्तरावर मिळालेले यश- प्रथम क्रमांक कुमारी सानवी पांचाळ (रोख १ हजार रूपये व प्रमाणपत्र), द्वितीय क्रमांक भाविका राजेशिर्के (७५० रूपये व प्रमाणपत्र), तृतीय क्रमांक स्वरा टक्के (५०० रूपये व प्रमाणपत्र). जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक कुमारी आर्या पवार (२ हजार रूपये व प्रमाणपत्र). राज्यस्तरावर चतुर्थ क्रमांक कुमारी सिद्धी बागवे (७ हजार ५०० रूपये व प्रमाणपत्र). तसेच पूर्वा साळुंखे, कृष्णाली खापरे, आदिती शेंडगे, श्रेया राडे, पूर्वा होडे, प्राची मोहिते व उत्कर्षा पवार या विद्यार्थ्यांनीही यश संपादन करत प्रमाणपत्र मिळवले आहे. या यशामागे मराठी विभाग प्रमुख व स्पर्धा समन्वयक योगेश नाचणकर, ग्रंथपाल सौ. अनुष्का काजरोळकर तसेच मराठी विषय शिक्षक सौ. अनुजा बागवे, भानुदास चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, उपाध्यक्ष प्रशांतजी निकम, डॉ. इसाक खतीब, युगंधराताई राजेशिर्के, कार्याध्यक्ष अनिरुद्धजी निकम, विश्वस्त व शालेय समितीचे अध्यक्ष शांताराम खानविलकर, सचिव महेश महाडिक तसेच प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.
सावर्डे विद्यालयाचे राज्यस्तरीय विश्वकोश स्पर्धेत घवघवीत यश
RELATED ARTICLES



