रत्नागिरी (प्रतिनिधी) : पत्नीशी कथित प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शहरातील गीताभवन परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक शशिकांत रहाटे (वय ३४, रा. तेलीआळी, रत्नागिरी) हे सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गीताभवन येथे उभे होते. त्यावेळी गणेश दत्ताराम महाडीक (रा. नरबे, करबुडे, रत्नागिरी) हा चारचाकी वाहनातून तेथे आला. पत्नीशी रहाटे यांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत संतप्त झालेल्या महाडीक याने रहाटे यांना शिवीगाळ करत, “तू माझ्या बायकोला फिरायला नेतोस काय? तू लग्न कसे करतोस तेच बघतो,” अशी धमकी दिली. त्यानंतर वाहनातून हॉकी स्टीक काढून रहाटे यांच्यावर हल्ला करत मारहाण केली. या हल्ल्यात अभिषेक रहाटे जखमी झाले असून त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार गणेश महाडीक याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
पत्नीशी कथित प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणावर हॉकी स्टीकने हल्ला
RELATED ARTICLES



