Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*चिपळूणमध्ये आयशर ट्रकची महावितरणच्या खांबांना धडक* *चाळीस हजारांचे नुकसान*

*चिपळूणमध्ये आयशर ट्रकची महावितरणच्या खांबांना धडक* *चाळीस हजारांचे नुकसान*

चिपळूण (प्रतिनिधी) : भरधाव वेगात असलेल्या एका आयशर ट्रकने मुरादपूर रेल्वे स्टेशन रोडवर महावितरणच्या दोन वीज खांबांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात महावितरणचे सुमारे ४० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, अपघातानंतर चालक कोणालाही कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुरादपूर अंतर्गत रोडवरील हरिविश्व अपार्टमेंटसमोर ही घटना घडली. आरोपी चालक किरण कृष्णा गडकरी (वय ४०, रा. पुणे) हा आपल्या ताब्यातील आयशर कंपनीचा प्रो एक्स मॉडेलचा ट्रक (वाहन क्रमांक एम.एच.१२ झेड.ई ४२२३) घेऊन जात होता. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरण कंपनीच्या मेन लाईनच्या पोलला आणि एलटी पोलला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही पोलचे प्रचंड नुकसान झाले असून विद्युत पुरवठाही बाधित झाला आहे. या अपघातात महावितरणचे अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून आरोपीच्या स्वतःच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अपघात घडल्यानंतर तातडीने मदत मागणे किंवा माहिती देणे अपेक्षित असताना, चालक किरण गडकरी हा पोलिसांना किंवा महावितरण प्रशासनाला न कळवता ट्रक घेऊन तेथून निघून गेला. याप्रकरणी चिपळूण महावितरणचे सहाय्यक अभियंता सचिन बाळकृष्ण कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments