चिपळूण (प्रतिनिधी) : बाळासाहेब माटे विद्यालय, कामथे येथे इयत्ता दहावी २००१-०२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार, दि. २६ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास सुमारे ४० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. डिंगणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी ज्येष्ठ शिक्षक घाग सर, नटे, गुरव, मुल्ला, बेंडाले, तांदळे, जोशी, साबणे तसेच कार्यालयीन कर्मचारी अंकुश माटे व शिपाई जाधव यांचा माजी विद्यार्थ्यांतर्फे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांचा शाळेमार्फत सत्कार करण्यात आला. स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेक विद्यार्थी भावुक झाले. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम, गप्पा-गोष्टी आणि स्नेहभोजनाचा सर्वांनी मनमुराद आनंद घेतला. हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश कदम यांनी केले. प्रास्ताविक शशिकांत खेडेकर यांनी मांडले, तर विजय माळी व जितेंद्र कांबळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*कामथे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात*
RELATED ARTICLES



