Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*चिपळूण तालुका आरोग्य निरीक्षक अभिजित यादव यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव*

*चिपळूण तालुका आरोग्य निरीक्षक अभिजित यादव यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव*

चिपळूण : जिल्हा हिवताप कार्यालय, चिपळूण अंतर्गत कार्यरत असलेले चिपळूण तालुका आरोग्य निरीक्षक तथा प्राथमिक आरोग्य केंद्र दादर येथील श्री. अभिजित कमलाकर यादव यांची रत्नागिरी जिल्ह्यातून उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली.

याप्रसंगी रत्नागिरी येथील मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर विष्णू जगताप यांच्या हस्ते श्री. यादव यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. तसेच भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कार्य करत राहावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आटले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, चिपळूण तालुका आरोग्य पर्यवेक्षक श्री. सुनील जानवलकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

श्री. अभिजित यादव हे सामाजिक, आरोग्य व सहकार क्षेत्रातही सक्रिय असून महाराष्ट्र राज्य जिल्हा हिवताप कर्मचारी संघटना शाखा रत्नागिरी उपाध्यक्ष, जिल्हा हिवताप कर्मचारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी व्हाईस चेअरमन, तालुका आरोग्य समन्वय समिती चिपळूण उपाध्यक्ष, निरंतर वैद्यकीय सेवा संस्था मर्यादित रत्नागिरी (सहकार मेडिकल) उपाध्यक्ष तसेच सूर्यमुखी मारुती मंदिर एमआयडीसी खेर्डी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments