Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमंगला एक्सप्रेसच्या वाहतुकीत अचानक अडथळा; कॅटेल गार्ड मेटल गार्डवर आदळला

मंगला एक्सप्रेसच्या वाहतुकीत अचानक अडथळा; कॅटेल गार्ड मेटल गार्डवर आदळला

खेड (प्रतिनिधी) : कोंकण रेल्वे मार्गावरील दिवाण-खवटी ते विन्हेरे स्थानकादरम्यान आज सकाळी मंगला एक्सप्रेसच्या वाहतुकीत काही काळासाठी अडथळा निर्माण झाला. 12618 मंगला एक्सप्रेस ही गाडी गोव्याच्या दिशेने जात असताना अचानक कॅटेल गार्ड मेटल गार्डवर आदळला. या धक्क्याची जाणीव होताच मोटारमनने जागरूकता दाखवत गाडी तात्काळ थांबवली आणि नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यानंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली. ही घटना रविवार 11 जानेवारी रोजी सकाळी 10.23 वाजता घडली. मोटारमनच्या माहितीवरून तांत्रिक पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तपासणीदरम्यान कॅटेल गार्ड मेटल गार्डमध्ये अडकून राहिल्याचे स्पष्ट झाले आणि तो कापून हटवणे आवश्यक होते. कोणतीही अडचण किंवा धोका निर्माण होऊ नये म्हणून तिथेच अत्यंत काळजीपूर्वक कॅटेल गार्ड कापून काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अवघ्या काही मिनिटांत तांत्रिक पथकाने हा अडथळा दूर केला आणि 10.47 वाजता मार्ग पुन्हा पूर्णपणे सुरळीत करण्यात आला. या सर्व घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मंगला एक्सप्रेसमधील प्रवासी सुरक्षित असून रेल्वे प्रशासनाने ही याबाबत स्पष्ट केलं आहे. ही घटना तात्पुरती असली तरी मोटारमनच्या तत्काळ निर्णयक्षमतेने आणि तांत्रिक पथकाच्या तत्पर कारवाईने मोठा अनर्थ टळला. कोंकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दै. प्रहारशी बोलताना सांगितले की, या घटनेचा कोंकण रेल्वेच्या नियमित वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. अडथळा कमी वेळात दूर करून हा मार्ग सामान्य करण्यात आला असल्याने इतर गाड्यांची वेळापत्रकेही बदलण्याची गरज भासली नाही. तांत्रिक अडथळा असूनही प्रशासनाने दाखवलेली दक्षता आणि जलद प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. या घटनेनंतर प्रवासी आणि स्थानिकांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले असून मंगला एक्सप्रेस पुन्हा नियमित वेळापत्रकानुसार मार्गस्थ झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments