Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हास्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेमध्ये दलवाई हायस्कूलचे यश

जिल्हास्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेमध्ये दलवाई हायस्कूलचे यश

चिपळूण (वार्ताहर) : ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल वालोपे येथे ग्रंथाली प्रकाशन व प्रतिभांगण आणि जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १० जानेवारी रोजी जिल्हास्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा पार पडल्या. डॉ. शरद काळे लिखित नाट्यातून विज्ञानाकडे या पुस्तकातील विविध नाटकांच्या आधारे ही एकांकिका स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये दलवाई हायस्कूल मिरजोळी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्याचबरोबर या नाटकातील इयत्ता आठवीमधील दूर्वांग प्रमोद जाधव यांनी साकारलेली मोहन सर ही भूमिका उत्कृष्ट अभिनयासाठी पात्र ठरली. नाटिकेमध्ये एकूण आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या नाटिकेसाठी प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका सौ.रागिनी आरेकर आणि मराठीच्या शिक्षिका सौ. समिधा डांगे यांनी मार्गदर्शन केले. या यशासाठी मुख्याध्यापक रोहित जाधव, त्याचबरोबर इतर शिक्षक वृंदांनी सर्व विद्यार्थ्यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments