Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*धारावीच्या प्रचार रॅलीत मा. आमदार सदानंद चव्हाण यांची उपस्थिती*

*धारावीच्या प्रचार रॅलीत मा. आमदार सदानंद चव्हाण यांची उपस्थिती*


चिपळूण..राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी मोठ्या विश्वासाने दिलेली जबाबदारी पार पाडत शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी धारावी मधील दोन प्रभागातील मराठी भागात आज रविवारी सकाळच्या सत्रात घरोघरी प्रचार केला. यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समितीचे माजी गटनेते राकेश शिंदे हे देखील उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक १८७ मध्ये शाहू नगर, कमला नगर या भागात मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत हे लक्षात घेऊन सदानंद चव्हाण यांनी तिथे लक्ष केंद्रित केले. येथील मराठी मतदारांना सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या वकील शेख यांच्या विजयाची हॅटट्रिक करण्याची विनंती श्री.चव्हाण यांनी मतदारांना केली. यावेळी या प्रभागाचे शाखाप्रमुख आनंद पिल्ले, माजी शाखाप्रमुख संजय काळे यांच्यासह महिला आघाडी युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रभागात उबाठा आणि काँग्रेस, शेकाप आणि अपक्ष उमेदवार आहेत.

प्रभाग क्रमांक १८८ मध्ये मुस्लिम आणि दक्षिण भारतीय मतदारांच्या तुलनेत मराठी मतदार कमी आहेत. या प्रभागातील कोकणी वस्तीत जाऊन सदानंद चव्हाण यांनी येथील मतदारांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना भास्कर शेट्टी यांचा विजय साकारण्यासाठी विनंती केली.कुठेही भाषणबाजी न करता थेट संवाद साधून श्री.चव्हाण यांनी मतदारांना आवाहन केले. या प्रभागात येथील शाखाप्रमुख किशोर मेहता, राकेश गायकवाड या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोकणातील आमदार प्रचारासाठी आल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. ठिकठिकाणी श्री चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले. दोन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे मा.सदानंद चव्हाण यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments