Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedसुंदर गाव स्पर्धेत गुणदे ग्रामपंचायत अव्वल  गावातील विधायक कामांची घेतली दखल  तालुकास्तरावर...

सुंदर गाव स्पर्धेत गुणदे ग्रामपंचायत अव्वल  गावातील विधायक कामांची घेतली दखल  तालुकास्तरावर यश

खेड (प्रतिनिधी) : शासनाच्या आर. आर. पाटील सुंदर गाव अभियान २०२३-२४ अंतर्गत तालुक्यातील गुणदे ग्रामपंचायतीने तालुकास्तरावर अव्वल स्थान पटकावले. गावात केलेल्या विधायक कामांची दखल घेत १० लाखांचे पारितोषिक पटकावले. गावाला विकासात्मक कामांसाठी १० लाख रुपयांचा निधी पुरस्कृत केले जाणार आहे.

गुणदे ग्रामपंचायतीने विविधांगी उपक्रम राबवत गावाला नवा ‘लूक’ प्राप्त करून दिला आहे. शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचून त्याचा लाम मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत कसोशीचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक उपक्रमात ग्रामस्थ, प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, अंगणवाडी, आशा सेविका, बचतगटाच्या महिला यांना सामावून घेत अभियान यशस्वी करण्यावर भर दिला जात आहे. ग्रामस्थांचाही सकारात्मक प्रतिसाद लामत असल्याने आजवरचे अभियान यशस्वी ठरले आहे. याचमुळे तालुकास्तर सुंदर गाव स्पर्धेत ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. १० लाख रुपयांच्या निधीतून ग्रामपंचायत हद्दीत सौर प्रकल्प बसवणे, स्वच्छतेबाबत अभिनव उपक्रम, शुद्ध पाणी वितरण प्रणाली कार्यरत करणे, गावामध्ये वायफाय यंत्रणा तसेच भौगोलिक माहिती प्रणाली लागू करणे, महिला सक्षमीकरण, बालस्नेही प्रकल्पाची अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायत जमिनीवरील अतिक्रमण रोखणे आदी कामे केली जाणार आहेत. सरपंच रवींद्र आंब्रे, उपसरपंच रुणाली आंब्रे, ग्रामपंचायत अधिकारी आरती मोरे, कर्मचारी सायली आंब्रे, ज्योती चाळके, संकेत आंब्रे, सुकेशनी सुतार यांचे सहकार्य लाभले. तसेच कृषी अधिकारी दिनेश राणे यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments