Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedदादासाहेब सरफरे विद्यालयात तालुकास्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेचे आयोजन

दादासाहेब सरफरे विद्यालयात तालुकास्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेचे आयोजन

संगमेश्वर (प्रतिनिधी) : येथील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी- शिवने येथे मंगळवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी १० ते १ या वेळेत तालुकास्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. इयत्ता ४ थी ते ५ वी, ६ वी ते ७वी व ८ वी ते १० वी या गटातील विद्यार्थ्यांच्या कला विषयक गुणांना प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश असून विद्यार्थ्याना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी संस्थेने व्यासपीठ दिले आहे. नाविण्यपुर्वक आशयपुर्ण निसर्ग चित्र असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र व सन्मानचिह देवून गौरविण्यात येणार आहे. तालुक्यातील शाळांतील विद्यार्थ्यानी या निसर्ग चित्र स्पर्धेत सहभागासाठी प्रशालेचे आर्ट टीचर प्रदीप कृष्णा शिवगण यांचेकडे नोंदणी करावी. संपर्क क्रमांक ८६६८७३७९४३ असून या स्पर्धेसाठी बहुसंखेने विद्यार्थ्यानी सहभाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष दिलीप मोरे, उपाध्यक्ष प्रताप देसाई, सरचिटणीस शरद बाईत, स्कुल कमिटी अध्यक्ष दिनेश जाधव व संचालक तसेच मुख्याध्यापक प्रकाश विरकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments