Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedवहाळ जिल्हापरिषद गटातून सौ.शिवानी संदीप सावंत यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

वहाळ जिल्हापरिषद गटातून सौ.शिवानी संदीप सावंत यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

चिपळूण:- अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या वहाळ जिल्हापरिषद गटातून सौ.शिवानी संदीप सावंत यांना शिवसेना महायुतीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.शिवसेना नेते पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम साहेब ,उपनेते माजी आमदार सदानंदजी चव्हाण साहेब , उपनेते माजी आमदार संजयराव कदम साहेब ,माजी आमदार सुभाषजी बने साहेब ,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळशेठ जाधव साहेब यांच्यासह शिवसेनेच्या सर्व नेते,पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले आहेत. चिपळूण तालुक्यातील वहाळ जिल्हापरिषद गट हा राजकीय प्रतिष्ठेचा व संवेदनशील मानला जातो.या गटातून कोणतीही निवडणूक लढणे म्हणजे एक धाडस मानले जाते. परंतु चिपळूण तालुक्यातील लढवय्या नेतृत्व असलेले संदीप सावंत यांनी हे धाडस दाखवत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे या गटातून उमेदवारी मागितली होती.सर्वसाधारण महिला आरक्षण या गटात पडल्याने संदीप सावंत यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिवानी सावंत यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्यांनी मैदानात उतरण्यासाठी कंबर कसली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ व मतदारांचा देखील त्यांना उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे. प्रत्यक्षात संदीप सावंत यांनी चिपळूणचे मैदान लीलया गाजवलेले आहे.आंदोलन सम्राट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख चिपळूण तालुक्यात निर्माण झाली आहे.सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या न्यायहक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढा देण्यात संदीप सावंत यांचा हातखंडा राहिला आहे.तर सौ.शिवानी सावंत या देखील पती संदीप सावंत यांच्या खांद्याला खांदा लावून राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत.कोरोना काळात त्यांनी केलेले काम तसेच या परिसरात महिलांसाठी उभे केलेले संघटन,बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण, शांत संयमी नेहमी हसतमुख तसेच प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारे महिला नेतृत्व म्हणून त्यांची ओळख या संपूर्ण परिसरात निर्माण झाली आहे. त्यांच्या या कामाची पोच पावती म्हणून एकनाथ शिंदे यांची शिवसेना व महायुतीकडून त्यांना वहाळ जिल्हापरिषद गटातून उमेदवारी देण्यात आली असून शिवसेना नेते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब ,शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम साहेब ,राज्याचे गृहमंत्री योगेशदादा कदम साहेब ,माजी आमदार तथा उपनेते सदानंदजी चव्हाण साहेब ,भाजप नेते माजी आमदार डॉ.विनयजी नातू साहेब,उपनेते माजी आमदार संजयराव कदम साहेब ,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळशेठ जाधव साहेब,माजी आमदार सुभाषजी बने साहेब ,भाजप नेते प्रशांतजी यादवसाहेब ,जिल्हाप्रमुख शशिकांतजी चव्हाण,राहुलजी पंडित, जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे यांच्यासह महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सौ.शिवानी संदीप सावंत यांच्या नावाला पाठिंबा देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले आहेत.त्यामुळे वहाळ जिल्हापरिषद गट आता पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा बनला आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments